Saturday, May 9, 2026
spot_img
Home लांजा दुचाकीस्वार मृत्यू प्रकरणी कारचालकावर गुन्हा

दुचाकीस्वार मृत्यू प्रकरणी कारचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील खानू येथे दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. १९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अपघाताची घटना घडली होती.

दीपक भिकाजी पवार (५१, रा. वेरवली बुद्रुक ता. लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दीपक पवार हा १९ मार्च रोजी कार (एमएच ०५ ईव्ही ६४३५) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरुन लांजा येथे जात होता. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खानू येथे दुचाकीस्वार आशिष किसन धाडवे (३३, रा. लांजा) याच्या दुचाकीला (एमएच ०४ डीएल ७९९६) जोराची धडक बसली. या अपघातात आशिष. याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दीपक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.