रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवलानुसार तालुक्यात केवळ 14 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
नव्याने आलेल्या अहवालानुसार 14 रुग्णांपैकी दीड महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. बाळ आणि आई दोघांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय कसोप मधील एका शंभर वर्षीय आजोबांना कोरोनाची लागण झाली आहे.
बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार गयाळवाडी येथे 1, साखरपा 1, कारवांचीवाडी येथे 3, हिंदू कॉलनी 1, मारुती मंदिर 2, टीआरपी 2, कसोप 1, साळवी स्टॉप 2 आणि एका खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.