नोडल अधिकार्यांना जिल्हाधिकार्यांच्या सुचना
रत्नागिरी:- नोडल अधिकार्यांवर दिलेली जबाबदारी सर्वांनी समन्वयाने काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकार्यांची शनिवारी बैठक झाली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सिधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, एस टी बस नियोजन, शस्त्र परवाने, खर्च विषयक समिती, प्रशिक्षण, टपाल मतपत्रिका नियोजन, एन जी पी एस वरील तक्रारींचे निवारण, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी १२ ड वाटप अर्ज, मतदार जन जागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाचे नियोजन आदीं बाबत सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले बॅंक खात्यात होणा]र्या संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवा. मतदान वाढीसाठी विशेषत: स्थलांतरित मतदारांवर फोकस करा. त्यांचे विविध व्हाटस घ्पचे समुह असतात. त्याद्वारे संपर्क करुन आवाहन करा. त्यांच्यापर्यंत पोहचा. आकाशवाणी तसेच समाज माध्यमांद्वारेही जनजागृती करावी.