दारू कारखान्यातील भंगार साहित्याची चोरी करणाऱ्या आठजणांना बेड्या

चिपळूण:- तालुक्यातील पेढाबे भराडेवाडीतील बंद असलेल्या दारू कारखाना मधील भंगाराचे साहित्य चोरून विक्रीसाठी नेत असताना शिरगाव पोलिसांनी आठ जणांना गाडीसह पकडले आहे. त्यांच्यावर शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून पेढांबे भराडेवाडीतील दारू कारखाना बंद अवस्थेत आहे. त्या ठीकणी असलेले पत्रे आणि इतर साहित्य यांचे चोरीचे सत्र कायम सुरू होते. रविवारी दुपारच्या त्या बंद दारू कारखाना मधील पत्रे व इतर साहित्य कटरच्या सहाय्याने अपो गाडीतून चोरून नेत असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून गाडीसह आठ जणांना ताब्यात घेतले.

सदरचे आठ जण चिपळूण परिसरातील आहेत. यामध्ये मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त होत असून शिरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. त्यामुळे यामध्ये मोठी धेंडे अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे करीत आहेत