रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव येथील एका लॉजच्या समोर दारूच्या नशेत मोठ्याने आरडा ओरडा करत सार्वजनिक शांतता भंग केली. याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ वा. सुमारास करण्यात आली.
संजय नाना गवळी (३२, रा. मिरजोळे पाडावेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिला पोलिस कॉस्टेबल गौरी सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणातील शुक्रवारी दुपारी संशयित हा कुवारबाव येथील हेमप्रभा लॉजच्या समोरील रस्त्यावर दारुच्या नशेत मोठ-मोठ्याने आरडाओरडा करुन हातवारे करत सार्वजनिक शांतता भंग करत असताना ही कारवाई करण्यात आली.