रत्नागिरी:- दारुसाठी पैसे मागितले असता तिने नाही म्हणून सांगितले या रागातून लादीचा तुकडा महिलेच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच सोडवा-सोडव करण्यास गेलेल्या दोघांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर सुरेश गुरव (वय ४५, रा. झारणीरोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २१) दुपारी तीनच्या सुमारास झारणीरोड येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ऐश्वर्या सागर गुरव (वय २१, रा. झारणीरोड, रत्नागिरी) यांच्याकडे सागर हा दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. त्यावेळी त्यांनी पैसे नाहित असे सांगितले. याचा राग मनात धरुन सागर याने घराच्या बाथरुमच्या बाजूला ठेवलेला लादीचा तुकडा उचलून डोक्यात मारुन दुखापत केली. त्यावेळी सोडवा सोडव करण्यासाठी गेलेल्या दोघांना संशयिताने शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ऐश्वर्या गुरव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









