दापोली हर्णै येथे उभ्या टेम्पोला आग लागून लाखोंचे नुकसान

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णै येथे उभ्या ट्रकला आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने हाहाकार उडाला. परिसरात धुराचे लोळ पसरले होते. टाटा 709 हा मच्छी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टेम्पो गेली 3 वर्षे हर्णै येथे बेवारस स्थितीत होता. या आगीत पूर्ण टेम्पो जळून खाक झाला आहे. हा टेम्पो मुरुड जंजिरा येथील एका मच्छी व्यापाऱ्यांचा असल्याचे समजते.

आज रविवारी दुपारी आग लागल्यानंतर दापोली नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाला माहिती कळविण्यात आली. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.