दापोली:-दापोली तालुक्यातील सोवेली मोहल्ला येथे शुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याने परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्यामुळे सुमारे 11 जणांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना 3 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्शीया इर्शाद टेटवलकर या सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःशीच बोलत होत्या. तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुगरा तय्यब टेटवलकर, तैमीना नदीम पावसकर या तेथे आल्या आणि अर्शीया टेटवलकर हिला आमचं आम्ही बघून घेऊ असे बोलत वाद घालायला सुरुवात केली. तसेच अर्शीया हिला हाताच्या थापटाने मारण्यास सुरुवात केली. तेव्हा नाजनीन अबूबकर पावस्कर, नजमा दिलावर पावसकर, नसिमा तय्यब पावसकर, यास्मिन गणी बावस्कर आफरीन सावरटकर फरीन पूर्ण नाव माहित नाही सर्व राहणार सो वेली या सदर ठिकाणी येऊन त्या सर्वांनी मिळून अर्शीया टेटवलकर हिला मारहाण केली. या मारहाणीत अर्शीया हिच्या पायाला दुखापत झाली. त्या वेळेला नाजनीन अबूबकर पावसकर हिने तुला कोठे तक्रार द्यायची ते दे आम्ही कोणाला घाबरत नाही तू तक्रार दिली तर तुला मारून टाकू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. याची फिर्याद आरशिया टेटवलकर हिने दापोली पोलीस स्थानकात दिली. या तक्रारीनुसार आठ जणांवर भादवि कलम 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याच प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करीत असताना तेहमिना नदीम पावसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या दरम्यान यातील अर्शीया इर्शाद टेटवलकर ही तिच्या घराच्या पाठीमागे कचरा काढत असताना तेहमिना ह्याचे नाव घेऊन तिला शिवीगाळ करत होती. तिचा संसार मोडेल अशी शिवीगाळ करत होती.
त्यासंदर्भात तू कोणाला बडबडते अशी विचारणा करण्यास गेली असता अर्शिया टेटवलकर हिने मी तुम्हाला काय बडबड करते ते सिद्ध करून दाखवा असे बोलून स्वतःच्या हातातील झाडू खाली टाकून बाजूला असलेल्या चुलीतील लाकडी काठी घेऊन फिर्यादीच्या पाठीत मारून दुखापत केली . सदर मारहाणीत फिर्यादीचा ड्रेस मागून फाडून त्याचे नुकसान करून अल्फिया इर्शाद टेटवलकर, इकरा इर्शाद टेटवलकर यांनीही येऊन फिर्यादीला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीनुसार तिघांवर भादवि कलम 324, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.