दापोली येथे दोघांना लोखंडी फावड्याने मारहाण

रत्नागिरी:- कादवली (ता. दापोली) येथील लोखंडी फावड्याने जखमी केलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत मारहाण करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लालन सिंग (वय १८) आणि राजेंद्र प्रसाद मेहता (वय ४५, रा. कादवली, ता. दापोली) हे घरात झोपलेले असताना कोणत्यातरी अज्ञात कारणातून संशयित सुरज प्रसाद मेहता (वय ३२) याने लोखंडी फावड्याने मारहाण केली. राजेंद्र मेहता याच्या फावडे डोक्यात मारुन दुखापत केली. त्यावेळी लालन सिंग सोडविण्यासाठी त्यालाही मारहाण केली. या प्रकरणी लालन सिंग याने जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे