Wednesday, May 6, 2026
spot_img
Home दापोली दापोलीमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

दापोलीमध्ये विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील किन्हळ येथे एका मतिमंद तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारी ३.०१ वाजता उघडकीस आली. संयोग सुनील येसवारे (वय २४, रा. किन्हळ, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, सायंकाळी ५.३० वाजता मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.