दापोली:-दापोली तालुक्यातील बुरोंडी कोळीवाडा येथे दोन भावांमध्ये सामाईक घरावरुन वाद चिघळला. वाद वाढल्यानंतर मारहाण झाल्याची घटना 30 मार्च रोजी दुपारी 1.15 वा. च्या सुमारास घडली. चौघांनी केलेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र पावसे व किरण पावसे, सत्यवान, दिपा, वासू पावसे हे नात्याने भाउ आहेत. यांच्यात जुन्या सामाईक घरावरुन वाद आहेत. 30 मार्च रोजी सर्व्हे नं. 661 ते 665 या जमिनीची मोजणी सुरु असताना राजेंद्र पावसे यांनी माझ्या जमिनीमध्ये मोजणी का करत आहात असे विचारल्याचा राग येवून किरण पावसे याने शिवीगाळ केली. यावेळी दीपा पावसे यांनी चपलेने मारहाण केली. वडिलांना होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी मुलगा संकेत गेला असता किरण पावसे यांनी लाकडी काठीने कपाळावर मारहाण केली. व वासू पावसे यानेही मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीतत संकेत राजेंद्र पावसे, राजेंद्र महादेव पावसे (51, बुरोंडी कोळीवाडा, दापोली) हे जखमी झाले.
याबाबतची फिर्याद राजेंद्र पावसे यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार किरण पावसे, सत्यवान पावसे, दीपा पावसे, वासू पावसे या चौघांवर भादविकलम 324, 232, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुजर करत आहेत.