दापोलीत दोन कारच्या धडकेत तरुण जखमी

दापोली:- दापोली तालुक्यातील साखळी येथील निसर्ग नर्सरीजवळ इको गाडी आणि होंडा कार यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार,सुरज संतोष कदम(वय २७, रा.आपटे मधलेवाडी)हे इको गाडीतून प्रवास करत होते.सदर गाडी नितीन दत्ताराम रांगोळी हे आपटे येथून गावतळेच्या दिशेने चालवत होते.निसर्ग नर्सरीजवळ आल्यानंतरसमोरून भरधाव वेगात येणाऱ्या होंडा कारने क्र.एमएच ४३बीएन २६७७) इको गाडीला जोरदार धडक दिली.

या अपघातात इको गाडीत प्रवास करणारे सुरज कदम जखमी झाले. होंडा कार आर्यन गणेश निकम(२१,रा.जुईनगर,नवी मुंबई) हे चालवत होते. जखमींना तत्काळ प्राथमिक उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बीएनएस कायदा कलम २८१ व १२५ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बुरोंडकर करीत आहेत.