Friday, June 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दापोलीत दुचाकीच्या डिकीमधून १६ हजाराचा अमली पदार्थ जप्त

दापोलीत दुचाकीच्या डिकीमधून १६ हजाराचा अमली पदार्थ जप्त

दापोली:- दापोलीत वारंवार छोट्या-मोठ्या अमली पदार्थ पकडण्याच्या घटना उघडकीस येत असतानाच काल पुन्हा एकदा सोळा हजार रुपयांचा गांजा पकडण्यात आला आहे. सुसंस्कृत दापोलीतील युवक व्यसनांच्या आधीन होऊन दापोलीची युवाशक्ती कमकुवत तर होत नाही ना अशी भीती या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून रोजी सायंकाळी सात च्या दरम्यान प्रांत कार्यालय दापोली समोर जाणाऱ्या रोडच्या लगत रेहाना जमिर काझी (वय ५० रा. रामराजे कॉलेजसमोर ता. दापोली), समीर मोहमद शेख (वय, ४६ रा. कोकंबाआळी ता. दापोली रत्नागिरी जिल्हा) यांचे सुझुकी कंपनीची एक्सेस दुचाकी गाडी आरटीओ नोंदणी क्रमांक एमएच/०८/बीजे/१९१२ या दुचाकीच्या डिकी मधून १६,०००/- रु. किंमतीचा काळपट रंगाचा गांजा सदृष्य अंमली पदार्थ त्यांचे एकत्रित वजन ८०० ग्रॅम आहे.  ५०,०००/- रु.किंमतीची दुचाकी असा ६६००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
११९/२०२६ एन.डी.पी.एस.कायदा ८ (क), २०(ब), २९ प्रमाणे दापोली पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शासकीय यंत्रणा करीत आहे.