दापोली:- स्वयंपाक खोलीच्या भिंतीवरून बेडरूममध्ये प्रवेश करून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना करंजाळी (ता. दापोली) येथे घडली. चोरट्याने एकूण ५१,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी घरातील कामगाराने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीबाबत निवेदिता सुधाकर चव्हाण (वय ३५, रा. करंजाळी-फणसू दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही चोरी १४ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत झाली आहे. ही चोरी कामगाराने केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्याने स्वयंपाक खोलीच्या भिंतीवरून बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यानंतर पर्समधील चावी काढून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या चोरीत ४९,५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २००० रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. या प्रकरणी दापोली पोलिस तपास करत आहेत.