दापोलीत काकावर पुतण्याकडून चाकूने वार

दापोली:-दापोली तालुक्यातील कर्दे येथे पुतण्याने 72 वर्षीय वयोवृद्ध चुलत्यावर पुतण्याने सुरीने सपासप वार केले. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वा. च्या सुमारास घडली आहे. यामध्ये चुलते गंभीर जखमी झाले आहेत. 

 दापोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यशवंत रांगले ( ७२ , राहणार कर्द – काकडेवाडी ) हे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या शेजारी असणाऱ्या पाटाच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी जात असताना पुतण्या विलास रांगले त्यांना शिविगाळ केली. चुलत्यानी याची विचारणा केली असता राग येऊन पुतण्या सुरा घेऊन आपल्या चुलत्यावर धावून गेला. यावेळी दोघांच्यात झटपट झाली. या झटापटीमध्ये वृद्ध काकाच्या दोन्ही हातांना व पोटावर सुरीने वार केला. तसेच त्यांच्या गुप्तांगाला पकडून खाद्याला जोरात चावा घेतला . ग्रामध्ये फिर्यादी यशवंत रांगले हे जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. संशयित आरोपी विलास रांगले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.