दापोली :- वनविभागातील संशयित वनपाल गणेश खेडेकर लाचलुचपत पथकाच्या जाळयात अडकला आहे. आज ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई झाली आहे. ५ हजार रुपयांची लाच घेताना या कारवाईत संशयित वनपाल खेडेकर यांना पथकाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत नेमकी सविस्तर माहिती थोड्या वेळात उपलब्ध होईल. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. एका व्यक्तीने वाहतूक पास संबंधी पैसे मागत असल्याची तक्रार केली होती. यावरून ही ट्रॅप लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.