एकाला वाचवण्यात यश
दापोली:- दिवाळीच्या दिवशीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या समुद्रात तिघे बुडाल्याची माहिती समोर आली आहे. एकाचा मृत्यू झाला असून दुसरा बेपत्ता आहे. तर तिसऱ्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने दापोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेली माहिती अशी की, दापोली तालुक्यातील पाळंदे बीचवर महाड येथून आठ तरुणांचा समूह पर्यटनासाठी आला होता. त्यापैकी तीन तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना आज दिवाळीच्या दिवशी घडली. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
तर तिसऱ्या तरुणाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.