दरवाजा लांबवणाऱ्या चोरट्याला पूर्णगड पोलिसांकडून अटक

रत्नागिरी:-तालुक्यातील कोळंबे येथील घराच्या पाठीमागील बाजुला असलेली अ‍ॅल्युमिनिअम फ्रेम मधील दरवाजा लांवणार्‍या संशयिताला पूर्णगड पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 10.40 वा. कालावधीत घडली होती.

दुर्गाप्रसाद वेदप्रकाश मिश्रा उर्फ बंटी (25,मुळ रा.उत्तप्रदेश सध्या रा.पावस,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत गिरीष विठ्ठल वाडेकर (65,मुळ रा.मुंबई सध्या रा.कोळंबे,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती.त्यानूसार,बुधवारी अज्ञाताने त्यांच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या सामान ठेवण्यासाठी केलेल्या ओट्याला लावलेला अ‍ॅल्युमिनिअम फ्रेममध्ये अ‍ॅक्रेलिक निळ्या रंगाची सिट लावलेला दुझडपी दरवाजा चोरुन नेला होता.याबाबत त्यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी काही तासांच्या आता दुर्गाप्रसादला अटक केली.गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 15 हजार रुपयांचा जामिन मंजूर केला.