थिबापॅलेस येथून दुचाकी पळविली; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस येथील इमारतीच्याखाली महिलेने पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ते ४ नोव्हेंबर या कालवाधी थिबापॅळेस येथील बिल्डींग मध्ये घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने दुचाकी (क्र. एमएच-१० बीयू ७७८४) ही सागर दर्शन हाईटस, टि.व्ही. टॉवर लेन थिबापॅलेस-रत्नागिरी येथील बिल्डींगच्या खाली पार्क करुन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.