दापोली:- एका खासगी कंपनीचे व्यवस्थापक सुभाष लोणारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला तालुक्यातील पाडले येथील सरपंच रवींद्र सातनाक याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सातनाक याच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
लोणारी यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी सातनाक याला दापोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सातनाक खंडणी मागत असल्याचे आणि ती न दिल्याने त्याने आपल्यावर हल्ला केल्याचे लोणारी यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुभाष लोणारी यांच्या छातीवर ३२ टाके पडले आहेत.