त्या रिक्षा चालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी:- भर दिवसा रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्‍या रिक्षा चालकाला न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

अविनाश म्हात्रे (35,रा.शांतीनगर,रत्नागिरी) असे संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवार 13 जून रोजी 3.30 वा. ते 4.30 वा. चे दरम्याने, जयस्तंभ ते कुवारबाव कडे जाणार्‍या रस्त्यावर घडली होती.याप्रकरणी पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता रविवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते.