तोणदे-भंडारवाडी येथे जागेच्या वादातून पती- पत्नीला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील तोणदे-भंडारवाडी येथे जमीन जागेच्या वादातून लाथा बुक्यांनी मारहाण झाली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन उर्फ पिंट्या प्रकाश शिरधनकर (रा. तोणदे भंडारवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २४) रात्री दहाच्या सुमारास भंडारवाडी-तोणदे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी यांच्या जमीन जाग्यावरुन वाद होता. मात्र हा वाद न्यायालयात जाऊन समेट घालण्यात आला होता. दोघांच्याही जमीनी वेगवेगळ्या झाल्या आहे. त्याचा राग संशयितासह कुटुंबियांना असल्याने ते
अधून मधून शिवीगाळ करत असतात. शुक्रवारी तुलशीचे लग्न लावून वाडीतील ग्रामस्थ गेल्यानंतर संशयिताने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन तुम्ही बाहेरून आली मी तुम्हाला गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली व अंगणातील तुळस उपटून नुकसान केले. फिर्यादी महिलेच्या पतीने याबाबत जाब विचारला असता संशयित सुदर्शन याने घरात घूसून फिर्यादींच्या पतीला लाथाबुक्यानी मारहाण केली. फिर्यादी सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही ढकलाबुकल केली. या प्रकरणी महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.