सौर ऊर्जानिर्मितीचे ३९८ ग्राहक; ७,६४२ किलोवॉट वीजनिर्मिती
रत्नागिरी:- महावितरण कंपनी जिल्ह्यातील ग्राहकांना वीज वितरीत करते हे आपल्याला माहिती असले तरी जिल्ह्यातील असे काही ग्राहक आहे, ते महावितरण कंपनीला वीज विकतात. सौरऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करून या ग्राहकांनी ही किमया केली आहे.
जिल्ह्यातील असे ३९८ ग्राहक असून त्यांनी घराच्या छतावर सौरसंच बसवून हा वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी करत उच्चदाब वर्गातील ३९६ ग्राहकांनी ७ हजार ६४२ किलोवॅट वीजनिर्मिती केली. या निर्मितीने महावितरणला अडचणीच्या काळात चांगलाच हात दिला. जिल्ह्यात लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ३९८ वीज ग्राहक वीजनिर्मिती करीत आहेत. स्वतःला वापरून उर्वरित वीज महावितरणला विकत आहेत. घरगुती २ व उच्चदाबाच्या ३९६ ग्राहकांनी सोलर रूफ टॉप यंत्रणा बसविली आहे. ७ हजार ६४७ किलोवॅट क्षमतेची वीजनिर्मिती ग्राहकांनी केली आहे. छतावर सौर छत संच उभारून वीजनिर्मिती करता येते. स्वयंनिर्मित वीजबिलात बचत होऊन नेटमीटरिंगमुळे शिल्लक वीज विकत घेतली जाते. घरगुती, समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना सोलर रूफ टॉप यंत्रणेसाठी केंद्र शासनाकडून ४० टक्के अनुदान देण्यात येते. ही योजना लाभार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे. अपारंपरिक आणि सुरक्षित ऊर्जा म्हणून सौर उर्जेकडे पाहिले जात आहे.