रत्नागिरी:- शहरातील तेली आळी भागात कोरोनाचे नवे सहा रुग्ण सापडले आहेत. यातील काहीजण सिविल ऍडमिट आहेत. तेली आळीसह शहर आणि तालुक्यात कोरोनाचा वाढता फैलाव चिंतेचा विषय ठरत आहे. याशिवाय सिविल मधील एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
शहरात आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मंगळवारी शहरातील तेली आळी भागातील कोरोनाचे सहा नवे रुग्ण सापडले आहेत. याशिवाय थिबा पॅलेस, एमआयडीसी येथे प्रत्येकी एक, कारवांचीवाडी येथे 3, कुवारबाव, गणेशगुळे, नाखरे, नाचणे, किर्तीनगर, उद्यमनगर भागात कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत.