तेजस एक्स्प्रेसच्या रविवारी अप-डाऊन दोन्ही फेऱ्या रद्द

रत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या अखत्यारित ठाणे दिवा रेल्वे लाईनवर अपग्रेडेशनच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी रविवारी २३ जानेवारीच्या तेजस एक्स्प्रेसच्या अप-डाऊन दोन्ही फेऱ्या (२२११९/२२१२०) रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वेच्या या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आणखी सहा एक्सप्रेस गाड्यांच्या येण्या-जाण्यावर परिणाम होणार आहे. या बाबत रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार २१ जानेवारी रोजी प्रवास सुरु होणाऱ्या तिरुअनंतपुरम- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस (१६३४६) गाडीचा प्रवास पनवेल स्थानकात संपणार आहे.

दि.२२ जानेवारी रोजी प्रवास सुरु होणारी गाडी क्र. १२०५२ मडगाव मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस पनवेल स्थानकात शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. या शिवाय २२ जानेवारीची मडगाव मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस (१०११२) देखील सीएस एमटी ऐवजी पनवेलपर्यंतच धावणार आहे. याचबरोबर दि. २३ रोजीची नेत्रावती डाऊन (१६३४५) एक्सप्रेस लो. टिळक टर्मिनसऐवजी पनवेल येथून तिरुअनंतपूरमसाठी सुटणार आहे. दि. २३ रोजी सुटणाऱ्या मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५१), मडगावपर्यंत धावणारी मांडवी एक्स्प्रेस (१०१०३) पनवेल येथून सुटणार आहे.