तेजस एक्सप्रेसमधून वृद्धाच्या मोबाईलची चोरी

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्टेशन तेजस एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्या वृद्धाच्या खिशात ठेवलेला ३० हजाराचा मोबाईल चोरट्याने पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप रामनाथ धारीया (वय ६३) हे शनिवारी रत्नागिरी रेल्वेस्टेशन फलाट क्र. ३ येथून कोकण रेल्वेच्या तेजस एक्स्प्रेसमध्ये चढत असताना त्यांच्या शर्टच्या खिशातील ३० हजाराचा मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पळविला. या प्रकरणी धारीया यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.