रत्नागिरी:- जिल्ह्यात गाजलेल्या तुळसणी येथील इप्सान उर्फ राजू मुकादम याला मारहाण करुन त्याच्यावर गरम पाणी ओतून त्याचा खून केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.या खटल्यात ९ संशयितांविरोधात दोषारोप पालिसांनी ठेवले आहे.
यातील संशयित सादीक हुसेन कापडी, मुअज्जम रज्जाक मुकादम, फिरदोस सादीक कापडी, आस्फीन मुअज्जम मुकादम व सादीक कापडी यांचे कामगार संदीप वामन पवार व विकास सुरेश पवार या सर्वांनी मिळून दि.२७/०३/२०१८ रोजी फिर्यादी इप्सान उर्फ राजू मुकादम हे घरी जात असताना त्याला अडवून त्याचे तोंडावर रुमाल दाबून त्याचा खून करण्यासाठी जबरदस्तीने त्याला उचलून मुअज्जम याचे घरात नेले. तेथे त्याला लाथा-बुक्यांनी मारहाण करून. तसेच घरातील छोट्या भांड्यातून घराचे मागील बाजूस असलेल्या चुलीवरील टोपातील गरमपाणी आणून त्याचे अंगावर ओतले. मारहाणीमुळे व अंगावर गरम पाणी ओतल्यामुळे इन्सान उर्फ राजू मुकादम हा होरपळून गेला. त्यातच तो गंभीर जखमी झाला.
या मारहाणीत गंभीर भाजलेल्या इप्सान उर्फ राजू मुकादम याचा ०१/०४/२०१८ रोजी वाशी येथे मृत्यू झाला. या खटल्याची सुनावणी रत्नागिरीचे मे. जिल्हा व सत्र न्यायामिश – १ श्री. बिले यांचे कोर्टात सुरु आहे. सरकार पक्षाच्या वतीने आजपर्यंत एकूण ३२ साक्षीदारांच्या जबान्या नोंदवण्यात आलेल्या आहेत. आता या खटल्या कामी आरोपीच्या जबाबासाठी केस नेमण्यात आलेली आहे.यातील मयत इप्सान उर्फ राजू मुकादम याची आई सुरैय्या मुकादम व फिर्यादी यांच्या तर्फे रत्नागिरी येथील अॅड. संकेत घाग हे देखील सरकार पक्षाला सहाय्यक वकिल म्हणून काम पाहत आहेत. तर आरोपींच्या वतीने रत्नागिरीतील प्रसिद्ध वकिल अॅड. गवाणकर व ॲड. प्रदिप नेने व अन्य वकिल काम पाहत आहेत. संशयित आरोपींचा जबाब व त्यानंतर अंतिम युक्तीवाद अशा टप्यांवर केसची सुनावणी झाल्यानंतर या खटल्याचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. गाजलेल्या या खटल्याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान दिवंगत प्रमुख जिल्हा सरकारी वकिल ॲड. व्ही. बी, गांधी हे सदर खटला सरकार पक्षाच्यावतीने पाहत होते. मात्र त्यांच्या अकाली निधानानंतर आता सरकार पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी हे काम पाहत आहेत.