Wednesday, May 13, 2026
spot_img
Home मंडणगड तुळशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

तुळशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील तुळशी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १० मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून, ११ मे रोजी सकाळी या तरुणाचा मृतदेह हाती आला.

​मिळालेल्या माहितीनुसार, अमित बाळकृष्ण शिगवण (वय ३२, रा. तुळशी-गणेशवाडी) हा तरुण रविवारी १० मे रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास तुळशी धरणावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, धरणाच्या काठावर असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

​अमित घरी न परतल्याने शोधाशोध सुरू होती. सोमवारी (११ मे) सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह धरणाच्या परिसरात मिळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

​या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ०६/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी ११ मे रोजी सकाळी १०:२२ वाजता या घटनेची रितसर दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.