82 लाखांचे दागिने केले लंपास
दापोली:- दापोलीत तीन गाड्यांमधून आलेल्या लुटारूंनी एका दांपत्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून लाखोंचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, दापोली-पाचवली येथील प्रशांत मोहिते यांचे कुटुंब बोलेरो गाडीने दापोली बोरिवलीकडे प्रवास करत होते. सोमवारी पहाटे पावणेतीन वाजता आंबिवली येथील साई सहारा हॉटेलजवळ आले असता तीन गाड्यांमधून आलेल्या लुटारूंनी त्यांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यानी मारहाण करत त्यांच्या अंगावरील 15 तोळे सोन्याचे दागिने लुटले. बाजार भावाप्रमाणे या दागिन्यांची किंमत 82 लाख रुपये आहे.
लुटारूंनी प्रशांत मोहिते यांच्या बहिणीचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर हे लुटारू दागिने घेऊन फरार झाले. याप्रकरणी दादरी पोलीस स्थानकात भादंवि कलम 395, 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.