तांबटआळी येथील मटका जुगारावर पोलिसांची धाड

रत्नागिरी:- शहरातील तांबटआळी येथील एका बिल्डींगच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आनंद विलास सातपुते (वय ३९, रा. सिल्व्हर प्लाझा धनजीनाका, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३१) सायंकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार चालवत होता. त्याच्याकडून पोलिसांनी साहित्यासह ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.