Saturday, September 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी तळेकांटेत पंप चोरीप्रकरणी दोघांना अटक

तळेकांटेत पंप चोरीप्रकरणी दोघांना अटक

संगमेश्वर पोलिसांची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर:- तालुक्यातील तळेकांटे येथून पाण्याचे पंप चोरून नेल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून ६० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे, चटकवाडी येथील आंब्याच्या बागेत असलेल्या घराशेजारील गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन पाण्याचे पंप चोरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल केला. ही घटना ६ ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली. याबाबत शांताराम जयराम पाटोळे (वय ८० वर्षे, रा. तळे, चटकवाडी) यांनी २६ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून कार्यवाही सुरू केली.

गोपनीय माहितीच्या आधारे २७ सप्टेंबरला तळेकर्नाट येथून मयुर संजय मांजरेकर (वय २५) आणि मयुर अनंत ७कांबळे (वय ३०, दोघे रा. बौद्धवाडी, तळेकांटे) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीला गेलेले दोन पंप आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस फौजदार श्री. गावीत, श्री. कोलगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. मनवल, श्री. बरगाले व पोलिस कॉन्स्टेबल श्री. खरपे यांनी सहभाग घेतला होता.