तळसर येथे विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा

चिपळूण:- मुंढे शिर्केवाडी येथे एका वृद्धेचा विनयभंग केल्याची घटना घडली. तसेच तिच्या मुलाला व पुतण्याला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध अलोरे-शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) रात्री घडली.

संशयित आरोपी संदीप भिकू शिर्के (रा. मुंढे शिर्केवाडी) याने विनयभंग केला. तसेच विशाल रवींद्र निचोरे, अनिल सीताराम शिर्के, संतोष भिकू शिर्के, यांनी पीडितेच्या मुलाला व पुतण्याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.