तरुणीच्या गर्भपात प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

देवरुख:- तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केल्याने तरुणी गर्भवती राहिली व तिच्या मनाविरुद्ध गर्भपात केला. याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला सोमवारी अटक करत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हरीदास शिवाजी बंडगर (मूळ रा. सलगर, ता. कवठेमहाकाळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, हरिदास व तरुणीची एका वेबसाईटवरून ओळख झाली होती. या ओळखीतून बंडगर याने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून अनेकवेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले. यातून ही तरुणी गर्भवती राहिली. अखेर तरुणीचा विश्वास संपादन करत बंडगर याने एका हॉस्पीटलमध्ये गर्भपात केला.