तन्वी घाणेकर मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

रत्नागिरी:- मिरजोळे येथे एका खाजगी कंपनीत कामाला असलेल्या सौ.तन्वी घाणेकर या बेपत्ता झाल्यानंतर तब्बल चार दिवसांनी छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह भगवती किल्ल्यासमोरील  कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत आढळल्यानंतर आता त्यांनी आत्महत्या केली कि घातपात झाला हे शवविच्छेदन अहवालावरुनच स्पष्ट होणार आहे. जिल्हा रुग्णालयातून अध्याप शवविच्छेदन आहवाल प्राप्त  न झाल्याने पोलीसांनी अंतिम निकर्ष काढला नाही. मात्र तन्वी घाणेकर यांच्या मोबाईला शोध सुरुच ठेवला असून मोबाईलचे अंतिम लोकेशन कोळंबे असल्याने पोलीसांनी त्या दिशेने तपास सुरु ठेवला आहे.

 विवाहितेचा पती  रितेश घाणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी सौ.तन्वी घाणेकर (३३.रा.खालचा फगरवठार )  ह्या  दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री ७.१५ वाजण्याच्या सुमारास  त्यांची मुलगी आनंदी हिला, मी बाजारात जावून येते. उशिर झाला तर जेवण करुन घ्या, असे सांगून दुचाकी (क्र.एमएच ० ८ एक्स ७११६) वरुन बाजारात गेल्या होत्या.   रात्री उशीरपर्यन घरी परतल्या नाहीत. दुसर्या दिवशी दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी दि.३० सप्टेंबरला शहर पोलीस स्थानकात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी  बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय विवाहितेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मÉतदेह भगवती किल्ल्यासमोरील  कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. सौ.तन्वी यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. तर शरिराचा काही भाग कुजून गेला होता. त्याच स्थितीत मृतदहे शवविच्छेदानासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. सोमवारी रात्री मृतदेहाचे शवविच्छेदन पुर्ण झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

बेपत्ता असलेल्या तन्वी घाणेकर यांचा कोणाशी वाद होता का?  त्यांनी आत्महत्या केली असेल तर त्याचे नेमके कारण काय? हे शोधण्यासाठी  मोबाईल मोठा पुरावा ठरणार आहे. मात्र तोच मोबाईल गायब आहे. त्यामुळे मोबाईल शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. दोन दिवसांपर्यंत मोबाईल सुरु असल्याने तो घटनास्थळीच आहे की अन्य कोण मोबाईलचा वापर करुन त्या बेपत्ता असल्याचे दाखवत होते का? याचा शोध पोलीसांना घ्यावा लागणार आहे. शवविच्छेदन अहवाल व मोबाईल दोन्ही प्राप्त झाल्यानंतरच पोलीस अंतिम निष्कर्षापर्यत पोहचणार आहेत.