तक्रारींचा राग मनात धरुन एकास माराहाण; १८ जणांवर गुन्हा दाखल

मंडणगड:- माहिती मिळवण्यासाठी केलेल्या तक्रारींचा राग मनात धरुन १८ जणांनी आपणास माराहाण केल्याची तक्रार संजय बाबूराव राणे (वय ६०) राहणार आदर्श नगर मंडणगड यांनी ११ डिसेंबर रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

तक्रारीनुसार राहूल कोकाटे, रुपेश साळुंखे, सौरव लेंडे, हेमंत दिवेकर, संतोष दिवेकर, दत्ताराम यादव, नितीन लेंडे, सतिश गोठल, रणवीर लेंडे, वीरेंद्र घोसाळकर, ओमकार लेंढे, धर्मेश रटाटे, सुहास घोलप, राजा पारेख, विद्या कोकाटे, शिवप्रसाद कामेरीकर, समिर लेंडे, विशाल कोकाटे सर्व राहणार मंडणगड या संशयितांविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटने संदर्भात फिर्यादीने नोंदवलेल्या तक्रारीतील माहितीनुसार, ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता फिर्यादी हे नगर पंचायत मंडणगड येथे त्यांनी दिलेल्या व्यापारी संकुलाच्या माहीती अधिकाराची चौकशी करण्याकरिता गेले होते.

यावेळी घटनेतील संशयित क्रमांक १ याने फिर्यादी यांस तु आमच्याबद्दल नेहमी तक्रार करतो, आम्हाला त्रास करतोस असे बोलून मनात राग धरुन फिर्यादी यांस मारहाण करण्यास सुरुवात सुरुवात केली. या प्रकरणी फिर्यादी व त्यांची पत्नी यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.