Saturday, May 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी डुगवे-कुरतडे येथील झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू

डुगवे-कुरतडे येथील झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- झाडे तोडण्याच्या मजूरीवर काम करणारा तरुण झाडावरुन पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अजित संतोष भोवड (वय ३१, रा. डुगवे-कुरतडे, ता. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास चाफे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित हा झाडे तोडण्यासाठी तालुक्यातील चाफे येथे आले होते. दुपारच्या सुमारास झाड तोडत असताना ते पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी प्रथम मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.