रत्नागिरी:- शहरानजीकच्या डी मार्ट समोरील रस्त्यावर रविवारी सायंकाळी दुचाकी आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील तरुणाचा उपचारांदरम्यान सोमवारी सकाळी 7 वा. मृत्यू झाला.
विथीलेश विनायक फगरे (22,रा.फगरवाठार, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी तो हातखंब्याच्या दिशेने जात असताना डी मार्ट समोरील रस्त्यावर त्याची एसटीला समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला होता.