ठेकेदाराला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते भाटीमिऱ्या, अलावा येथे शिवागाळ व हॉकीच्या स्टीकने मारहाण करणाऱ्या चार संशयितांनी ठेकेदाराला मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानस किर (वय ३०, रा. अभ्युदयनगर, रत्नागिरी ) व अन्य तीन मानसचे मित्र असे संशयित आहेत (नाव, गाव, माहित नाही) ही घटना सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरातील चर्मालय ते भाटीमिऱ्या अलावा येथील दत्तमंदिरजवळील मोकळ्या मैदानात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सचिन मधुकर वाडकर (वय ३९, रा. गयाळवाडी, मुळ. निढळेवाडी, ता. संगमेश्वर) हे व संशयित मानस कीर व त्याचे तीन मित्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनी शेजारील बारमध्ये मद्य प्राशन करुन बाहेर पडले होत. त्यानंतर फिर्यादी सचिन वाडकर व त्यांचे तीन मित्र चारचाकी गाडीमध्ये बसले असता संशयित मानस किर व त्यांच्या मित्रांनी सचिन वाडकर यांच्या नाकावर, चेहऱ्यावर हाताच्या ठोश्याने मारहाण करुन त्याला चाररस्ता चर्मालय येथे सोडले. त्यानंतर फिर्यादी हे स्वरुप पेट्रोल पंप मिस्त्री व्हिला येथे मजगाव रोड येथे आले असता पुन्हा संशयित मानस किर व त्याच्या मित्रांनी सचिन यास हॉकीच्या स्टीकने मारहाण करुन मानस किर यांच्या मोटारीत बसवून अलावा येथील दत्तमंदिरजवळ मोकळ्या मैदानात नेऊन पुन्हा अंगावरिल कपडे काढून हॉकीच्या स्टीकने शरीरावर मारहाण करुन शिवीगाळ केली. या मारहाणीत सचिन वाडकर जखमी झाले त्यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.