ट्रेनमध्ये महिला प्रवाशाची पर्स लांबवली, 38 हजाराचा ऐवज गेला चोरीला

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने प्रवास करणार्‍या वृध्द दाम्पत्याची किंमती ऐवज असलेली पर्स चोरीस गेल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान घडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश बलदेवप्रसाद तिवारी (56, पवई मुंबई) हे आपल्या पत्नीसह कोकण रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान झोप लागल्याने उशाखाली ठेवलेली पत्नीची पर्स व त्यामधील सॅमसंगचा 16 हजार रुपयांचा मोबाईल, 22 हजार 500 रुपयांचा रोख रक्कम असा एकूण 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

याबाबतची फिर्याद ओमप्रकाश तिवारी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात 19 फेब्रुवारी रोजी दिली. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.