ट्रेनमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील 90 हजारांचे मंगळसूत्राची चोरी

खेड:- खेड रेल्वे स्टेशनवरून ठाणे येथे जाण्यासाठी पॅसेंजर ट्रेनमध्ये चढताना गर्दीचा फायदा उठवत अज्ञाताने महिलेच्या पर्समधील 90 हजारांचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची फिर्याद अमृता अमित कांगणे (24, कांगणेवाडी खेड) यांनी पोलिस स्थानकात दिली. याप्रकरणी अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.