राजापूर रेल्वे स्थानकादरम्यान घडली घटना
राजापूर:- कोचिवली ते चंदिगड केरळ ते मुंबई असा संपर्क क्रांती ट्रेनने प्रवास करणार्या महिलेच्या दागिन्यांसह 2 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. राजापूर पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मरियाम्मा शंकर देवेंद्र (46, शिवराई, नेहरुनगर, विलेपार्ले, मुंबई) यांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरियाम्मा या 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.11 वा. च्या दरम्याने कोचिवली ते चंदिगड केरला संपर्क क्रांती एक्स्प्रेसने मुंबईला जात होत्या. दरम्यान ट्रेन राजापूर रेल्वे स्टेशन क्रॉसिंगला थांबली असता अज्ञाताने मरियाम्मा यांच्या सिटीवर हॅण्ड बॅग लांबवली. या बॅगेत 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 6 हजार रुपये किंमतीचे टायटन कंपनीचे लेडीज घडयाळ, 4 हजार रुपये किंमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल, 50 हजार रुपये किंमतीची रोख रक्कम, 12 रुपये किंमती ग्रे कलरची लेडीज बॅग असा एकूण 2 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. राजापूर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.









