ट्रक अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा

चिपळूण:- दारुच्या नशेत असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कुंभार्ली घाटात रस्त्यालगत उलटल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या अपघातात तो ट्रक चालक जखमी झाला आहे. याप्रकरणी त्या ट्रक चालकावर अलोरे-शिरगाव पोलीस अण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  शिवाजी पंढरी सोनवाड (३३, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद प्रमोद आनंदा वायदंडे (३४, अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी सोनवाड हा दारुच्या नशेत ट्रक चालवत हैद्राबादहून रत्नागिरीकडे येत होता. भरधाव वेगातील ट्रकवरील ताबा सुटल्याने ह टक रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटला. यात तो जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.