टीडब्ल्यूजे कंपनीच्या नार्वेकर दाम्पत्यावर नागपुरातही गुन्हा

६० जणांची तब्बल १४.२४ कोटीची फसवणूक केल्याची तक्रार

चिपळूण:- गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकासह संचालक पत्नीवर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत असताना आता नागपुरातही या दाम्पत्यासह १० जणांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ६० जणांची तब्बल १४ कोटी २४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, प्रतीक जासुतकर, संजय जासुतकर, वर्षा जासुतकर, स्वाती वैद्य, राजेंद्र जासुतकर, इंदू जासुतकर, पुनम जासुतकर अशी

फसवणुकीची व्याप्ती वाढली

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भरघोस परताव्याचे आमिष दाखवलेल्या टीडब्ल्यूजे कंपनीमध्ये अनेकांनी लाखोच्या पटीत रकमा गुंतवल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर हा आर्थिक ‘टीडब्ल्यूजे” विरोधात आहे. ‘टीडब्ल्यूजे मध्ये गुंतवणूक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला

केलेल्यांची संख्या अधिक असल्याने फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढत जाणार आहे. या फसवणूकप्रकरणी नार्वेकर दांपत्यावर चिपळुणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी बायपास रोडवरच्या पागमळा येथे असलेल्या टीडब्ल्यूजे कार्यालयात रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून कागदपत्रांची तपासणी केली होती. या फसवणूकप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत असताना नार्वेकर दांपत्यावर नागपुरातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ६० जणांनी याबाबत तक्रारी दिल्या असून १४ कोटी २४ लाख ६० हजार इतक्या रकमेची फसवणूक केली आहे.