झाडगाव एमआयडीसी फ्लॅटमधील गोदाम फोडून दीड लाखांच्या मासेमारी सामानाची चोरी

रत्नागिरी:- शहराजवळील झाडगाव एमआयडीसी येथील फ्लॅटमधील गोदाम फोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ५३ हजार ५५० रुपयांचे मासेमारीचे सामान चोरले. ही घटना ८ ते २२ ऑगस्ट कालावधीत घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इम्तीखा नाझीम पठाण (३६,रा. मिरकरवाडा खडप मोहल्ला, रत्नागिरी) यांचा मासेमारीचा धंदा आहे. त्यांचे झाडगाव एमआयडीसी येथे एका फ्लॅटमध्ये गोदाम आहे. ८ ते २२ ऑगस्ट या कालवधीत चोरट्याने गोदामाच्या लोखंडी शटरला लावलेले कुलूप – आणि गोदामाच्या मागे असलेल्या घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १ लाख ५१ हजार ३०० रुपयांच्या १७८ मासेमारीच्या पितळी रिंगा २ हजार २५० किंमतीच्या शिशाच्या १८० गुली (तुकडे), असा एकूण १ लाख ५३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पळविला.

याप्रकरणी इम्तीखाफ पठाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.