जेलरोड येथील महिलेची दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील जेलरोड येथील महिलेची अज्ञाताने तब्बल 1 लाख 58 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 23 आणि 24 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली असून याबाबत पिडीत महिलेने शनिवार 17 फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.47 रोजी ग्लोबल मेडिकल आरोग्य मंदिर येथे असताना अज्ञाताने पिडीतेच्या बँक खात्यातून प्रथम 98 हजार 999 रुपये आणि नंतर 1 हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने काढले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.48 वा. पिडीत महिला जेल रोड येथील महाडवाला बंगल्यासमोर असताना अज्ञाताने त्यांच्या बँक खात्यातून प्रथम 49 हजार 999 त्यानंतर 8 हजाार रुपये ऑनलाईन पध्दतीने काढून एकूण 1 लाख 58 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने पावणे दोन महिन्यांनंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.