रत्नागिरी:- शहरातनजीकच्या जुवे मळी येथील आंबा बागेत नेपाळी तरुणीने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना रविवार 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.20 वा.उघडकीस आली.
सुमन लालवीर बिका (24,रा.मुळ रा.नेपाळ सध्या रा.जुवे,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.सुमन बिका ही जुवे मळी येथील प्रसाद चव्हाण यांच्या आंबा बागेत कामाला होती.रविवारी सायंकाळी तीने अज्ञात कारणातून बागेतीलच एका आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.ही बाब तेथील इतर कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांनी गावातील इतर नागरिकांच्या मदतीने तिने फास लावलेली ओढणी कोयतीने कापुन खाली उतरवून खाजगी गाडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी सुमनला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सोमवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









