रत्नागिरी:- ‘‘मागच्या वेळी तुला सोडून दिले, आता तुला बघतोच’’ असे बोलत हातातून फरशीचा तुकडा फेकून मारत तरुणाला व त्याच्या भावाला मारहाण केल्या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिहान दाऊद मुनावरे (वय २४, रा. राजीवडा सुरैय्या यांच्या घरी भाड्याने) हा शनिवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास जेवण झाल्यानंतर भाऊ जुजदान याला सोबत घेऊन राजीवडा नाका येथे ओळखीचे पागी असलेले अमीर मुजावर यांना भेटण्याकरीता जात होते. जामा मस्जिद येथे समोरुन जिबरान भाटकर व त्याची आई असे दोघे चालत येत होते. यावेळी जिबरान हा नशेत होता. जिबरान यांनी रिहान याला उजव्या हाताच्या कोपराने धक्का दिला व शिव्या देऊन ‘मागच्यावेळी तुला सोडून दिले, आता तुुला बघतोच’ असे म्हणून हातातील फरशीचा तुकडा रिहानच्या दिशेने भिरकावला.
जिबरान याने भिरकावलेले फरशीचा तुकडा रिहान याच्या उजव्या बाजूच्या डोळ्याजळ लागून रिहान जखमी झाला. यावेळी भाऊ जुजदान हा सोडविण्यासाठी पुढे गेला असता महंमद अशिर उर्फ बबल अश्रफ नाखवा (वय ३०) हा जिबरानच्या मदतीसाठी धावत आला व त्याने रिहान व त्याचा भाऊ जुजदान याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.या मारहाणीत रिहान दाऊद अनावरे (वय २४) हा जखमी झाला आहे.
या प्रकरणी रिहान याने शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी जिबरान भाटकर व महंमद अशीर उर्फ बबलू अश्रफ नाखवा याच्या विरोधात भा. दं. वि. क. ३२४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हे. कॉं. हरचकर करीत आहेत.