खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक परिसरात धामणदेवी वसाहत – एमआयडीसी कॉलनीच्या पाठीमागे जुगार खेळणाऱ्या १६ जणांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले . या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणी पोलिसांनी तीन लाख २७ हजार १६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये २४,०१० रुपये रोख रक्कम , जुगार साहित्य आणि दुचाकींचा समावेश आहे . हे सर्व जण १३ पानी नॉकआउट , १० – १० पॉइंटचा रमी जुगार खेळ पैसे लावून खेळत होते . या प्रकरणी भार्गव लक्ष्मण चाळके , सत्तार रोशन धामसकर ( ५६ ) , जयवंत मनोहर उत्तेकर , असगर अली नाखुदा ( ५० ) , तन्वीर अब्दुल रहिम घारे ( ४४ ) , अजित अशोक जाधव ( ५० ) , विजय महादेव शिर्के ( ५९ ) , राजेंद्र रामचंद्र आंब्रे ( ५३ ) , रूपेश रवींद्र काजवे ( ३२ ) , नथुराम बारकू दाभोळकर ( ५० ) , सिकंदर उस्मान कडवेकर ( ४७ ) , अब्बास हुसेन चरवडकर ( ४७ ) , सुनील कृष्णा कदम ( ५१ ) , प्रवीण प्रभाकर कदम ( ३० ) , अविनाश सदाशिव आंब्रे , महेश मधुकर महाडिक आणि जनार्दन तुकाराम चाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना धाड टाकून ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.