रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचा मुख्य दरवाजा उचकटून चोरट्याने लॅपटॉप व सीपीयु असा २० हजाराच्या मुद्देमालावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी शासकीय कार्यालयात चोऱ्या करण्याकडे मार्चा वळवला असल्याची चर्चा मात्र रंगत आहे. ही घटना गुरुवारी (ता. १४) ऑगस्टला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ ते १४ ऑगस्टला रात्रीच्या मुदतीत चोरट्याने कार्यालयाचा मुख्य दरवाजा कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून आत प्रवेश करुन कार्यालयातील लॅपटॉप व सीपीयू पळवून नेला. या प्रकरणी जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता योगेश नंजप्पा (वय ५५, रा. लक्ष्मी केशव नगर, कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.