रत्नागिरी:- शहरातील जिल्हा परिषदजवळील मुख्य रस्त्यावर मोटार अडवून मारहाण व गाडीचे नुकसान करणाऱ्या पाचजणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमान शेखासन दानिश मुल्ला व अन्य तीन संशयित आहेत. हा प्रकार गुरूवारी (ता. १७) दुपारी घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्र व त्याच्या पत्नी व दोन बहिणींसह मोटार घेऊन मांडवी बीच येथे गेले होते. तेथून ते कोकणनगर येथे जात असताना जिल्हा परिषद मुख्य रस्त्यावर संशयितांनी त्यांचा पाठलाग करून गाडी अडवून संशयित आमान शेखासन याने गाडीच्या बोनेटवर चढून गाडीची समोरील काच फोडली. संशयित दानिश मुल्ला याने ड्रायव्हरच्या बाजूचा गाडीचा दरवाजा व मागच्या दरवाजाचे हँडल ओढून तोडून टाकले. तर अन्य तिघांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पाचजणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









